पारडगाव : घनसांवगी तालुक्यातील पाडरगाव येथे रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात पशुपालकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून पालण्यात येत असलेल्या नियमांना नागरिकांनी तिलांजली दिली असल्याचे दिसून आले. यावेळी एकाही नागरिकांने सुरक्षित अंतराचे पालन केले नाही. शिवाय कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता.
मराठवाड्यात पारडगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे मध्यंतरी काही महिने बाजार भरविणे बंद होते. परंतु, मागील काही दिवसांपासून हा बाजार शासन नियमांचे पालन करून भरविण्यात येत आहे. रविवारी भरलेल्या बाजारात विविध जातींची जनावरे व्यापाºयांसह पशुपालकांनी विक्रीसाठी आणली होती. जनावरांची खरेदी- विक्रीसाठी जिल्ह्यासह पंचक्रोशीतील व्यापारी, नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी जणूकाय कोरोना गेला की काय? असेच चित्र दिसून आले. बाजारात एका बैल जोडीची ६० हजार रूपयांपासून एक लाख रूपयांपर्यंत किंमत होती. म्हशीचे दर ७० हजार ते एक लाखाहून अधिक होते. व्यापारी पांडुरंग चव्हाण म्हणाले, पारडगाव येथे भरणाºया आठवडी बाजारत अधिक प्रमाणात म्हशींची खरेदी- विक्री होते.
बाजारकरूंची परवड कायम
स्वतंत्र काळापासून पारडगाव येथील बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. असे असले तरी आजवर बाजारात येणाºया नागरिकांसाठी कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. बाजारात शेतकºयांना बसण्यासह सावलीची देखील व्यवस्था नाही. भावी सरपंचाने या बाजारात भौतीक सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.