कोरोनाचा शहर आणि तालुकानिहाय तपशील खालीप्रमाणे आहे. त्यात जालना शहर १३९, तालुका टाकरवन १, भाटेपुरी १, सेवली १, गोलापांगरी २, पहेगाव १, कुंभेफळ २, मंठा शहर १, मंठा तालुका पांगरी गोसावी १, परतूर शहर २, तालुका वाटूर फाटा २, वाघडी १, दैठणा २, पोखरी १ तसेच घनसावंगी शहर १, तालुक्यातील रांजणी १, वडीरानगर १, रांजणवाडी १, देवनगर १, अंबड शहर ३, तालुका घुंगर्डे हादगाव १, जामखेड ३, हस्तपुरी १, मठपिंपळगाव एक, माहेर भायगव्हाण १, बदनापूर तालुका आन्वी १, वाकूळणी दोन, असरखेडा १, बदनापूर १, शेलगाव २, जाफराबाद शहर ३, गारखेडा १, हनुमंतखेड २, जानेफळ १, जवखेड १, वरूड १, भोकरदन शहर २, तालुक्यातील वालसांगी २, केदारखेडा दोन, दानापूर २ असे एकूण २०४ रुग्णांचा समावेश आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील ६ तर औरंगाबाद जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.
चौकट
कोरोना योद्धे लसीकरणानंतर पॉझिटिव्ह
कोरोनाच्या कचाट्यात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले तसेच जिल्हा परिषदेचे डीएचओ. विवेक खतगावकर तसेच समन्वयक डॉ. संतोष कडले हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी देखील कोरोनाच्या प्रचलित लसीचे दोन डोस पूर्ण केले होते. त्यानंतरही कोरोनाने यांना गाठल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे असले तरी लसीकरण हे चुकीचे आहे, असे न समजण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लस घेतल्यावरही मास्क आणि सॅनिटायझरचा नियिमित उपायोग बंधनकारक करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. सुरक्षित अंतरालही तेवढेच महत्त्व असल्याचे सांगण्यात आले.