जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १४ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारीच २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार १११ वर गेली असून, आजवर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ४५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ११ तर तालुक्यातील खरपुडी येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. परतूर शहरातील ३ तर तालुक्यातील यावलापिंपरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी शहरातील १ तर अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बदनापूर तालुक्यातील खंदारी येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील एकास कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १९ हजार १०९ जण संशयित आहेत. मंगळवारी ३१९ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ४४५ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर परतूर शहरातील के.जी.बी.व्ही येथील अलगीकरण कक्षात तिघांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.