बाधितांमध्ये जालना तालुक्यातील देहेडकरवाडी १, सोमनाथ १, मंठा तालुक्यातील केंधळी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर १, सिरजगाव १, उस्मानपूर १, घनसावंगी तालुक्यातील कृष्ण नगर तां. १, मुद्रेगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड तालुक्यातील अंबड शहर १, बालेगाव २, चंदनपुरी ३, जळगाव १, कासारवाडी १, लालवाडी १, नालेवाडी २, रेणापुरी १, जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुंटा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन तालुक्यातील भोकरदन १, आन्वा ३, करजगाव २, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद १, बुलढाणा जिल्ह्यात एकास कोरोनाची बाधा झाली.
जिल्ह्यात कोरोनाचे ३२२ रुग्ण सक्रिय
जिल्ह्यात सध्या ३२२ सक्रिय रुग्ण आहेत. बाधित रुग्णांवर अलगीकरणासह रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार ८४४ वर गेली असून, त्यातील ११२५ जणांचा मृत्यू झाला आहे तर, ५९ हजार ३९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.