जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा बुधवारी मृत्यू झाला. बुधवारीच ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४२ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार १४६ वर गेली असून, आजवर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील खडकवाडी १, तानवाडी १, एम.चिंचोली १, बि.जळगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड शहरातील ३ तर तालुक्यातील कासोड १, दुधपुरी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील काथेडगाव १, तपोवन गोंधन येथील १ तर भोकरदन शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ४, औरंगाबाद १, वाशिम येथील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १९ हजार १५३ जण संशयित आहेत. दरम्यान, परतूर येथील के.जी.बी.व्ही अलगीकरण कक्षात ३ जणांना ठेवण्यात आले आहे.