शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

corona virus : केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यास महाराष्ट्राचा त्याला पाठिंबा : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 2:05 PM

corona virus : देशपातळीवरही लॉकडाऊनविषयी चर्चा करण्यात येत असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे सीरम इन्स्टिट्यूटने राज्याला प्राधान्य द्यावे‘स्पुटनिक’ची लस खरेदी करणार

जालना : देशपातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. याविषयी निर्णय घेतला गेल्यास महाराष्ट्राचा त्याला पाठिंबाच असेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ही राज्यातील कंपनी असल्यामुळे आदर पूनावाला यांनी राज्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.

जालनाचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसह खरीप हंगामाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात कोरोनावरील लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्राचे एक अतूट नाते आहे. या संस्थेत उत्पादित होणारी लस खरेदी करण्यास राज्य शासन तयार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतर लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करीत आहेत. याशिवाय अमेरिकेतील तज्ज्ञांशीही ऑनलाईन संवाद साधला आहे. त्यातही त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त केली. त्यामुळे देशपातळीवरही लॉकडाऊनविषयी चर्चा करण्यात येत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

‘स्पुटनिक’ची खरेदी करणारदेशात उपलब्ध होत असलेल्या लसींसोबत परदेशातील लस खरेदी करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. रशियात बनविण्यात आलेली स्पुटनिक ही लस भारतात दाखल झाली आहे. केंद्र शासनाने ही लस उपलब्ध केल्यास आम्ही खरेदी करून नागरिकांचे लसीकरण केले जाईल. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने समोर येत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालनाMaharashtraमहाराष्ट्र