जालना : येथील एसआरपीएफच्या चार जवानांसह १४ जणांचा अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
यात एसआरपीएफचे चार जवान, जालना शहरातील वाल्मिक नगर येथील ६८ वर्षीय महिला, दर्गावेस भागातील ६० वृध्द, भाग्यनगर मधील ३७ वर्षीय व्यक्ती व एक ७२ वर्षीय वृध्द, काद्राबाद भागातील ८० वर्षीय वृध्द महिला, २० वर्षीय युवक व एक १६ वर्षीय युवक, शंकरनगर भागातील १२ वर्षीय मुलगी, समर्थनगर मधील एक ५८ वर्षीय महिला, अंबड येथील एक ३५ वर्षीय युवकाचा यात समावेश आहे.
तर पुर्नपडताळणीसाठी स्वॅब पाठविल्यानंतर नान्सी येथील एक महिला, एक पुरूष व एक ४१ वर्षीय व्यक्तीसह वैद्यवडगाव येथील एक ४४ वर्षीय व्यक्तीचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २९१ वर गेली आहे. त्यातील आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर १६५ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.