जालना : जिल्ह्यातील ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली आहे.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून सोमवारी ८४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात विनायकनगर मधील सात जण, एका हॉटेलमधील तीन, मस्तगड येथील एक, भारतनगर येथील एक, व्यंकटेशनगर येथील एक, जेसीपी बीएएनएल कॉलनीतील एक, बारवार गल्लीतील एक, संभाजीनगर मधील एक, पेन्शनपुरी येथील एक, सत्करनगर येथील एक, अकेली मशिद परिसरातील एक, खाजगी रूग्णालयातील एक, मंगल बाजार येथील एक, नरीमनगर येथील एक, संजोगनगर येथील दोन, वसुंधरानगर येथील तीन जणांसह इतर सहा जणांचा यात समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली असून, यातील १३ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.