ठळक मुद्देआठ बाधितांपैकी सहा जण हे जालना शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत उपचारानंतर १५० जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज
जालना : रविवारी सकाळी नवीन आठ रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आठ बाधितांपैकी सहा जण हे जालना शहरातील आहेत.
यामध्ये रामनगर मधील एक ३६ वर्षीय व्यक्ती, नानक निवास मधील एका ७ वर्षीय मुलगी, एक १४ वर्षीय मुलगी व एक ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील अलंकार थिएटरजवळील एक ४८ वर्षीय व्यक्तीचा व विठ्ठल-रूक्मिणी नगर मधील एक३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील एक १८ वर्षीय मुलगा व एक ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या आता २७७ वर गेली आहे. त्यातील आठ जणांचा बळी गेला असून, उपचारानंतर १५० जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.