जालना : जिल्ह्यातील ३४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी प्राप्त अहवालातून समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता तब्बल ७१९ वर गेली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून शनिवारी २१० जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आहे होते. त्यातील ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ९५ अहवाल निगेटिव्ह असून, इतर अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. बाधितांमध्ये जालना शहरातील २८ जणांचा समावेश आहे. यात जेपीसी बँक कॉलनीतील चार, गांधीनगरमधील दोन, जेईएस कॉलेज भागातील दोन, बुरहान नगरमधील सात, भाग्यनगर मधील एक, दानाबाजारमधील पाच, कादराबाद भागातील दोन, कन्हैय्यानगर भागातील एक, संभाजीनगर मधील एक, क्रांतीनगर मधील एक, नालगल्लीतील एक, सुवर्णकारनगर मधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर चुर्मापुरी (जालना) येथील एक, शेवगाव (परतूर) येथील एक, भालगाव येथील एक, दहिपुरी (अंबड) येथील एक, रामगोपाल नगर पडेगाव औरंगाबाद येथील दोन अशा एकूण ३४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७१९ वर गेली असून, त्यातील २२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ४०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.