जालना : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतत असताना आठ ते नऊ जण हे जालन्या जिल्ह्यातील शहागड येथे मुक्कामास थांबले होते. यामुळे खबरदारीचा उपायम्हणून शहागड येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना तातडीने जालना येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
देशभर दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी काही भाविकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे या कार्यक्रमात सहभागी सर्वांची युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. शहागड येथे याच कार्यक्रमातून परतलेला आठ ते नऊ जणांचा जथा थांबला होता. येथे काही वेळ थांबल्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी गेले. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना खबरदारीच उपाय म्हणून रविवारी पहाटे तातडीने तपासणीसाठी ताब्यात घेतले. जालना येथील जिल्हा रूग्णालयातील कोरोना संदर्भातील चाचणीसाठी दाखल करून त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिका-यांनी दिली आहे.