शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus : जालन्यात चार एसआरपीएफ जवानांचा कोरोनावर विजय; रुग्णालयातून मिळाली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 4:18 PM

जालन्यात आजवर एका महिलेसह पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत

ठळक मुद्देआतापर्यंत १२ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालना : कोरोनामुक्त झालेल्या एसआरपीएफच्या चार जवानांना गुरूवारी दुपारी जालना येथील कोविड रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या कोरोनामुक्त जवानांना निरोप दिला. जालन्यात आजवर एका महिलेसह पाच जण कोरोनामुक्त झाले असून, १२ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यात आजवर १७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या शेलवडा येथील महिलेला २९ एप्रिल रोजी डिश्चार्ज देण्यात आला होता. मात्र, १ मे रोजी मालेगाव येथून परत आलेल्या चार जवानांसह सातोना येथील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रूग्णांवर १४ दिवस जिल्हा रूग्णालयातील कोविड रूग्णालयात उपचार करण्यात आले. पाच पैकी सातोना येथील कोरोना बाधित रूग्णाचा दुसरा अहवाल बुधवारी १३ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर त्या चार जवानांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या या चारही जवानांना गुरूवारी कोविड रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. एस. टी. कुलकर्णी, कोविड इन्चार्ज डॉ. संजय जगताप,  डॉ. आशिष राठोड, डॉ. सर्वेश पाटील, डॉ. नितीन पवार यांच्यासह परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

दु:खीनगर मधील महिलेच्या प्रकृतीत सुधारणाजूना जालना शहरातील दु:खीनगर मध्ये जिल्ह्यातील पहिली कोरोना बाधित महिला आढळून आली होती. त्या महिलेवर महिनाभरापासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्या महिलेला लवकरच डिश्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना