जालना : शहरातील एक दोन नव्हे तब्बल ८० जणांचा कोरोना अहवाल गुरूवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
बाधित रूग्णांमध्ये संभाजीनगर भागातील तब्बल ३६ जणांचा समावेश आहे. तर लक्कडकोट ६, मस्तगड ५, रूक्मिणीनगनर ४, पाणीवेस ४, पोलास गल्ली ३, पुष्पकरनगर ३, नेहरू रोड २, गोकुळ विहार १, कालीकुर्ती १, अंबरहॉटेल परिसर १, लक्ष्मीनगर १, बुºहाणणनगर १, निलम नगर १, चंदनझिरा १, सिध्दीवनायक नगर १, शंकर नगर १, तट्टूपुरा १, आनंदस्वामी गल्ली १, नळ गल्ली १, खडकपुरा १, मोदीखाना १, संजय नगर १, मित्तलनगर १, दु:खीनगरमधील एक अशा एकूण ८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११८२ वर गेली असून, त्यातील ४९ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ७१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.