जालना : शहरातील विविध भागातील सहा जणांचा कोरोना अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३५९ वर गेली आहे.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून शुक्रवारी ६७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार ५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रूग्ण जालना शहरातील आहेत. तर दोन नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. बाधित रूग्णांमध्ये जालना शहरातील दहेकरवाडी येथील एक ४५ वर्षीय महिला, नरीमननगर मधील एक ३१ वर्षीय व्यक्ती, रेहमानगंज येथील एक ३० वर्षीय व्यक्ती, श्रीकृष्णनगर येथील एक ४८ वर्षीय व्यक्ती व कुरेशी मोहल्ला भागातील एका ३४ वर्षीय व्यक्ती ला कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या आता ३५९ वर गेली आहे. त्यातील १० जणांचा बळी गेला असून, उपचारानंतर २२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.