जालना : रूग्णालयात उपचार सुरू असताना तीन कोरोनाबाधित रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. तर ५७ जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ५९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
कोविड रूग्णालयात उपचार सुरू असताना तीन कोरोना बाधित रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. मयतांमध्ये जालना शहरातील म्हाडा कॉलनीतील ८३ वर्षीय पुरूष, गायत्रीनगर भागातील ७८ वर्षीय पुरूष व जाफराबाद शहरातील ७५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ५७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील भाग्यनगर २, सोरटीनगर ३, रामनगर साखर कारखाना २, शंकरनगर ३, सदर बाजार १, सामान्य रुग्णालय निवासस्थान १, मिशन हॉस्पिटल परिसर १, शहागड १, ओम शांती कॉलनी अंबड ४, वाघाळा ता. मंठा २, मंठा शहर ४, दैठणा १, बदनापूर २, सुखापुरी १, कोठा ता. घनसावंगी २, जिल्हा महिला रुग्णालय २, तीर्थपुरी १, इंदिरानगर १, लालवाडी १ अशा ३५ जणांचा आरटी पीसीआर तपासणीद्वारे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ५९ जणांनाही बुधवारी घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांची संख्या ३८५० वरजिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८५० वर गेली आहे. त्यातील १११ जणांचा बळी गेला आहे. तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर २४६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित १२७४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
४४ जणांवर कारवाईचा बडगाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे, सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ जणांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. जिल्हाभरात करण्यात आलेल्या या कारवाईत ७७५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजवर नियम मोडणाऱ्या ४०९० जणांवर कारवाई करून ८ लाख ६१ हजार ५१० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.