शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

भोजन योजनेतील भ्रष्टाचार चिंताजनक- राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून भारतीय संस्कृतीत ओळखले जाते. मध्यंतरी देशभर फिरत असताना सरकारने सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून भारतीय संस्कृतीत ओळखले जाते. मध्यंतरी देशभर फिरत असताना सरकारने सुरू केलेल्या या विद्यार्थ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनेतही भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले. यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. ही चिंताजनक बाब असून, याचे आपल्याला अश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सर्वांनी पारदर्शकतेला महत्त्व देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.राज्यपाल कोशियारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथील महिको आणि इस्कॉनतर्फे चालविण्यात येणाºया अन्नामृत पोषण आहार योजनेच्या अद्ययावत स्वयंपाकगृहाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. पुढे बोलताना कोश्यारी म्हणाले, भारत ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये मोठा फरक आहे. काही तत्त्ववेत्यांनी मानवाला सोशल प्राणी म्हणून संबोधले आहे. परंतु, मानव आणि अन्य प्राण्यांमध्ये मोठा फरक आहे. अन्नग्रहण करण्यासाठी प्राणी जंगलात भटकत असतात. परंतु, मानवाला मात्र तशी गरज नाही. परोपकारी वृत्ती हा मानवी स्वभाव आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी त्याला स्वार्थ जडल्याचे दिसून येते. संतांनी परोपकार कसे करावेत, हे सांगून ठेवले आहे. परंतु त्याचा विसर पडलेला दिसत आहे.मानवाने परोपकार करताना निसर्गाचेही संवर्धन करून वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगणे हेच मानवी ध्येय असले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकारकडून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी मध्यान्नभोजन योजना सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. परंतु, मंत्री आणि खासदार असताना देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना या योजनेतही अनेकजण गैरव्यवहार करतात. हे निदर्शनास आल्यावर मोठे आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. देशातील भ्रष्टाचारामुळे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीही देशातील एक रूपयापैकी केवळ १५ पैसेच हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात, यावरूनच त्यांनी त्यावेळची स्थिती विशद केली होती.उपक्रम : १२ लाख विद्यार्थ्यांना लाभप्रास्ताविक इस्कॉनचे डॉ. राधाकृष्ण प्रभू यांनी केले. त्यांनी इस्कॉनचे प्रणेते प्रभूपाद यांच्या पश्चिमबंगालमधील मायापूर येथील अनुभवाचा किस्सा सांगितला. मायापूरमध्ये एका कचराकुंडीजवळ फेकलेले अन्न गोळा करण्यासाठी लहान मुले कशी धडपड करीत होते आणि त्यांच्या अंगावर कुत्रे भुंकतानाचे विदारक चित्र प्रभूपाद यांनी टिपले.त्यानंतर इस्कॉन केंद्राच्या दहा किलोमीटर परिसरात कोणीही मुलगा अथवा माणूस भूकेला राहू नये, यातूनच २००४ साली मुंबईत प्रथम ९०० मुलांसाठी खिचडी वाटून या अन्नामृत प्रकल्पाचा प्रारंभ झाल्याचे सांगितले. आजघडीला १२ लाख विद्यार्थ्यांना या अन्नामृत योजनेतून ८ राज्यात पोषण आहार पुरविला जात असल्याचे डॉ. राधाकृष्ण प्रभू म्हणाले.जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांनादेणार पौष्टिक आहारयावेळी महिकोचे संचालक राजेंद्र बारवाले यांनी वडील बद्रीनारायण बारवाले यांच्या सांगण्यानुसार आपण जालन्यात उद्योगाच्या माध्यमातून चार कोटी रूपयांचे सोशल (सीएसआर) मधून गोल्डन ज्युबिली या परिसरात इस्कॉनच्या अन्नामृत योजनेचा श्रीगणेशा केला आहे. भविष्यात जिल्हाभरातील एक लाख विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार विविध शाळांमधून देण्याचीही आमची योजना असल्याचे सांगून यासाठी इस्कॉनकडून जी मदत झाली त्याबद्दल त्यांनी आभार मानले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीgovernment schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थीSocialसामाजिक