शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा पणनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:04 AM

खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव क्विंटलमागे ५०० रूपयांनी खाली आले आहेत. याचा परिणाम पणन महासंघाच्या (सीसीआय) खरेदीवर जाणवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव क्विंटलमागे ५०० रूपयांनी खाली आले आहेत. याचा परिणाम पणन महासंघाच्या (सीसीआय) खरेदीवर जाणवला आहे. अनेक शेतकरी आता आपला कापूस विक्रीसाठी पणनकडे आणत असल्याने केंद्रावर मोजणी करण्यासाठी विलंब लागत आहे.जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात पणन महासंघाचे कापूस खरेदीस प्रारंभ केला होता. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५०० रूपये भाव दिला जात होत. परंतु, आता पाहिजे तसा दर्जेदार कापूस येत नसल्याने १०० ते २०० रुपये दरामध्ये कपात करण्यात आली आहे. असे असले तरी खुल्या बाजारपेठेतील दरापेक्षा आमचे दर हे हमीभावाचे असल्याने त्यात कमी करता येत नाही.जिल्ह्यातील जालना, बदनापूर, परतूर, मंठा येथेही सीसीआयने खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तेथेही ब-यापैकी कापसाची आवक सध्याही कायम आहे. जालना बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली असून, आजघडीला शेकडो वाहने कापूस विक्रीसाठी बाजार समितीच्या परिसरात उभी आहेत.खुल्या बाजारपेठेतील व्यापा-यांनी शेतक-यांना रोखीने पैसे दिल्याने काही जणांनी कमी किमतीतही त्यांना कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली आहे. यासंदर्भात पणनचे अधिकारी हेमंत ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड