शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही : आ. भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:16 AM

शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.

ठळक मुद्देसंघर्ष मोर्चाला शेतक-यांनी दिला मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला.परतूर येथे जालना जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख म्हणुन माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी खा. मतुकाराम रेंगे, रा. कॉ. प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, राजाभाऊ देशमुख, अ‍ॅड. अन्वर देशमुख, राजेश राठोड, शेख महेमुद, राजेंद्र राख, किसन मोरे, निळकंठ वायाळे हे होते.पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, आपले गणीत चुकल्याने विरोधकांनी डाव साधला. यांची सत्ता चुकून आल्याने हे असेच वागणार. आज शेतकरी स्वत: ला संपवायला लागला आहे. त्याची दखल घ्यायला हे शासन तयार नाही. चार वर्षात या सरकारने केवळ आश्वासन व पोकळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात कोणालाच काही दिले नाही. या जॅकेट वाल्या सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांच्या भावनांचा चक्काचुर केला. चार वर्षात या सरकारने आम्ही आणलेल्या योजनांचे उद्घाटन आणि भाषणच केली. या सरकारन चोरांना कर्ज दिले. महागाई वाढली. शेतकºयांच्या मालाला भाव नाही, तुर बोंडआळीचे पैसे नाही, कर्जमाफी ही फसवी निघाली. गॅस, पट्रोल, डीझेलसह इतर सर्वच वस्तूचे भाव गगनाला नेवून भिडवले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुरेश कुमार जेथलीया म्हणाले की, या सरकार मधील मंत्र्यांनी सत्तेत येण्यासाठी अनेक मोर्चे काढले. आता मात्र सत्तेत आल्यावर सर्व विसरून गेले. या सरकारच्या सर्व घोषणा सर्व कागदावरच आहे. त्यामुळे येणाºया काळात सरकार पडल्या शिवाय राहणार नाही.या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी गणेश बोराडे, जि. प. सदस्य घनवट, अखिल काजी, राजेश भुजबळ, रहेमु कुरेशी विजय जºहाड, अण्णासाहेब खंदारे यांच्यास कार्यकर्ते उपस्थित होते.परतूर : शेतकरीच धडा शिकवतीलशेतकºयांना कोणतेच अनूदान मिळाले नाही, कर्जमाफीत शेतकºयांना फायदा झाला नाही. आमच्या पालकमंत्र्याच्या लोणी या गावातच शेतकºयांने आज आत्महत्या केली, इतर गावातील आत्महत्या हे काय रोखणार. केवळ बैठका व बदला घेण्याचे राजकारण आमचे पालकमंत्री करीत असल्याचे सांगून या सरकारला धडा आता आमचा शेतकरी बांधवच क रेल असेही मा. आ. जेथलिया यांनी सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, भाउसाहेब गोरे यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर टिका करीत स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी नितीन जेथलिया यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेसMorchaमोर्चा