लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा गौण खनिज अधिकारी जालना यांनी पीरकल्याण येथील गौण खनिज परवाना दिला आहे. २१ जानेवारी रोजी फिर्यादी राजू जगताप यांच्याकडे त्यांच्या मालकीचे टिप्पर घेऊन चालक कृष्णा लिंबाजी बकाल हे बुलडाण्याकडे वाळू घेऊन जात होते. भराज बुद्रूक (ता.जाफराबाद) येथे महसूल पथकाने टिप्पर थांबविले. चालकाने कागदपत्रे दाखविल्यानंतरही ते वाहन जाफराबाद तहसील कार्यालयात नेण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर अधिकाऱ्यांनी नियमानुसार तीन लाख रूपये दंड होतो, आम्हाला एक लाख रूपये द्या, तुमचा टिप्पर सोडतो, असे म्हटले.
नायब तहसीलदारांसह तलाठ्याविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:15 AM