शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

Crime News: मित्रासोबत समलैंगिक, महिलेसोबत अनैतिक संबंध, जालन्यात बँक अधिकाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:32 PM

Crime News: समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे यांचा खून केल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मंठा (जि. जालना) : समलैंगिक व अनैतिक संबंधातून बँक अधिकारी असलेले प्रदीप भाऊराव कायंदे यांचा खून केल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सोपान सदाशिव बोराडे (३७) व प्रकाश सदाशिव बोराडे (४७, दोघे रा. शांतीनगर, मंठा) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिस तपासातील माहितीनुसार एका एजन्सीमार्फत एचडीएफसी बँक वसुली अधिकारी म्हणून काम करणारे प्रदीप कायंदे यांचे कार्यक्षेत्र जालना होते. ते समलिंगी संबंध ठेवणाऱ्या एका ग्रुपच्या संपर्कात आले होते. अनेकदा कामावरून देऊळगावराजा येथे घरी न जाता ते मंठा येथील त्याच्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या मित्राच्या घरी जात असत. असेच ७ एप्रिल या दिवशीही प्रदीप कायंदे त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्रासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, प्रदीप याचे एका महिलेशीही अनैतिक संबंध होते. यातून वाद होऊन संशयितांनी ८ एप्रिलला प्रदीपचा खून केला.

मृतदेह नेला मार्केट यार्डात  प्रदीप यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह मंठा मार्केट यार्ड परिसरात नेऊन टाकला होता, ही बाब तपासात समोर आली. यामध्ये एकूण चार आरोपी आहेत. त्यांपैकी दोघांना अटक केली असून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना