शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा

By संजय तिपाले | Published: August 06, 2023 3:45 PM

पत्रकारितेच्या आडून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा: आरमोरी पोलिसांकडून कसून चौकशी

गडचिरोली : आरमोरी येथील डॉक्टर दाम्पत्याला धमकावत ब्लॅकमेल करणाऱ्या खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. यापूर्वी एकावर बलात्काराचा तर दुसऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. नागपूर येेथे पोर्टलच्या आडून त्यांनी ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा सुरु केला होता, त्यांनी अशा पध्दतीने आणखी कोणाकोणाकडून खंडणी उकळली, याची पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे.

अमित प्रभाकर वांद्रे (वय ३२), दिनेश सदाशिव कुंभारे (४२), विनय विजय देशभ्रतार (२७), रोशन भयालाल बरमासे (३६), सुनील मधुकर बोरकर (४६, सर्व, रा. नागपूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या पाच जणांपैकी दोघे नागपूर येथे पोर्टल चालवितात, तर तिघे त्यांचे सहकारी आहेत. आरमोरी येथीलसोनाली अमोल धात्रक (३८, रा. आरमोरी) या खासगी डॉक्टर आहेत तर त्यांचे पती डॉ.अमोल हे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत.

३ ऑगस्टपासून हे सर्व जण डॉ.सोनाली व डॉ.अमोल यांना तुमची वैद्यकीय शिक्षणाची पदवी बनावट असल्याचा आरोप करुन पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावत होते, शिवाय घरी जाऊन डॉ. सोनाली यांच्या पर्समधून एक लाख रुपये हिसकावत चार लाख रुपयांसाठी व्हॉटस्अप कॉल तसेच प्रत्यक्ष भेटूनही ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरु होता. अखेर ४ ऑगस्टला डॉ. सोनाली धात्रक यांनी धाडस दाखवत आरमोरी ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पाच जणांवर खंडणी, दरोडा, घरात विनापरवाना प्रवेश या कलमांन्वये गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेचे पथक व आरमोरी पोलिसांनी रात्रीतून अटकसत्र राबवून पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. सध्या ते पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील, आणखी कोणाकडून त्यांनी खंडणी वसूल केली आहे का, यादृष्टीने तपास सुरु असल्याचे उपअधीक्षक साहिल झरकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.

नागपूरमध्ये कारनामे

दरम्यान, यातील दोन आरोपींनी यापूर्वी नागपूरमध्ये कारनामे केल्याची पोलिस दफ्तरी नोंद आढळली आहे. एकावर बलात्कार व दुसऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. नागपूरमध्ये त्यांनी काही व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याची प्राथमिकमाहिती आहे, पण अद्याप तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. योग्य तो तपास केला जाईल, असे आरमोरीचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी संदीप मंडलिक यांनी सांगितले.