शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनिमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:56 AM

साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. पुंजाप्पा भगवानअप्पा दुकानदार (रा. अंबरवाडी ता. जिंतूर) असे मुनिमाचे नाव आहे.सराफा व्यापारी शशिकांत शिवराजअप्पा बेंडके (रा. जिंतूर जि.परभणी) यांनी शनिवारी जालन्यात मुनीम पुंजाप्पा दुकानदार याला सोन्या- चांदीचे दागिने आणण्यासाठी पाठविले होते. जालन्यातील सुराणा ज्वेलर्स येथून १०० ग्रॅम सोने आणि पावणेतीन किलो चांदी असा ४ लाख ६१ हजार १८५ रुपयांच्या मुद्देमालाची मुनिमाने खरेदी केली होती. त्यानंतर मुनिमाने आॅटोरिक्षातून जात असताना चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचे सांगितले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली होती. दरम्यान, पो. नि. राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा मुनीम पुंजाप्पा दुकानदार याने केला. या माहितीवरुन मुनिमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेचार लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, सपोउपनि. कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, फुलसिंग गुसिंगे, सदाशिव राठोड आदींनी पार पाडली.

टॅग्स :jewelleryदागिनेRobberyदरोडाArrestअटक