लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : महानुभाव पंथाचे उपकाशी म्हणून संबोधले जाणारे व दत्तात्रय प्रभू यांचे नित्य भोजन स्थान असलेले श्री आत्मतीर्थ स्थान श्री पांचाळेश्वर येथे चैत्र वद्य समाप्तीस सांगता शुक्रवारी होत आहे. यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जरी आत्मतीर्थ स्थान घडे, तरी बहु जन्मार्जित पापसंघ बिघडे, पुण्यरुप होय रोकडे, जना माजी, जे दत्तात्रेयाचे निरंतर क्रीडास्थान , आत्मतीर्थ म्हणजे महातीर्थ गहन, तेथे जो करी वंदन, तो कधी शोकाते न पवे .अशा या पांचाळेश्वर महास्थानाला पौराणिक संदर्भ पाहत असताना ऋषि व पांचाळराजांच्या घटनांचा परामर्श पाहताना दंडकारण्याचा संबध येतो.पुराण काळातील सांस्कृतीक , आध्यात्मिक घटनांचे निरीक्षण करतांना असे लक्षात येते की , दंडकारण्य हे पुराणकाळातील घटनांचे - घडामोडीचे मुख्य केंद्रस्थान होते. मध्य भारतातील दंडकारण्य तापी आणि पयोष्णी नदी या नद्यामधील प्रदेश व महाभारतातील काही भाग मिळून होतो. रामायणामध्ये विंध्य पर्वत व शैल्य पर्वत यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशालाही दंडकारण्य असे म्हटलेले आहे. वायू पुराणात गोदावरी, कृष्णा नदी या दंडकारण्यातून वाहतात. परिप्लस या पाश्चात्य विचारवंताच्या मतानुसार कल्याण, नगर, पैठण, ही शहरे दंडकारण्यातच येतात. दंडराजाच्या नावावरुन त्या भागाला दंडकारण्य असे म्हणतात .श्री क्षेत्र पांचाळेश्वर आत्मतीर्थ स्थानाची यात्रा चैत्र वद्य सप्तमीच्या दिवशी आनंदाने साजरी होते. दत्तात्रेय महाराजांची मूर्ती आकर्षक अशा पितळी पालखीमधून विराजमान होते. व अवस्थान मंदिरातून निघून आत्मतीर्थ स्थानाकडे सर्व संतमहंत मंगल वाद्यासह निघतात. तो मंगळ सोहळा चतुर्विध साधनांच्या भेटीचा असतो. तत्प्रसंगी प्रथमत: दर्यापूरकर बाबांच्या सवाद्य पालखीतून मिरवणूक निघून आत्मतीर्थाकडे जाते. गुरुवारी होणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.
अंकुशनगर येथील पांचाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:06 AM