टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारातील कपाशीच्या शेतात छापा टाकून टेंभुर्णी पोलिसांनी तब्बल ७० किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई टेंभुर्णी पोलिसांनी शनिवारी दुपारी केली आहे.
टेंभुर्णी पोलिसांना खानापूर शिवारातील एका शेतात गांजाची झाडे असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार टेंभुर्णी पोलिसांसह तहसील व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत खानापूर येथील एका इसमाच्या शेतातील सुमारे सात लाख रुपये किमतीचा ७० किलो गांजा टेंभुर्णी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी खानापूर येथील गट क्रमांक १३२ मधील एका इसमाविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ, नायब तहसीलदार अनिल चव्हाण, कृषी सहायक विजय जाधव, तलाठी नारायण डाके, सिद्धेश्वर बोर्डे, पोलिस कर्मचारी पंडित गवळी, गजेंद्र भुतेकर, अशोक घोंगे, प्रदीप धोंडगे, दिनकर चंदनशिवे, सागर शिवरकर, संजय बेडवाल, होमगार्ड रामेश्वर घोडके, राहुल खरात, धम्मदीप आढावे, राहुल माघाडे, कैलास दुधाने, प्रकाश भुतेकर आदींनी केली आहे.