लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्राहकांना चांगली बँक सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. परंतु मध्यंतरी काही चुकीच्या पध्दतीने ग्राहकांना गंडवण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीपासून ग्राहकांना सजग करण्यासाठी हा ग्राहक मेळवा असल्याचे प्रतिपादन बँक आॅफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सुरेंद्र गुप्ता यांनी सांगितले.येथील आयमए हॉलमध्ये नुकताच बँक आॅफ इंडियातर्फे ग्राहक मेळावा घेण्यात आला. त्यात डिजिटल बँकिंगचे फायदे आणि तोटे यावर चर्चा करण्यात आली. अनेक ग्राहकांकडे आज एटीएम कार्ड आहे. परंतु बहुतांश ग्राहकांना त्यांचा पिनकोड माहिती नसतो. तो आम्ही उघडून देतो असे सांगून अनेकांना लुटल्याचे दिसून आले.एकूणच ग्राहकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्यासह बँकेच्या विविध नूतन सेवेबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी वेंकटमणी, अभय पांडे, अजय पांडे, धनंजय देशपांडे, विलास खोरगडे, विटेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ग्राहकांनी भूलथापांना बळी पडू नये - गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:37 AM