लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शनिवारी गोपाळ काल्यानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोरा तयार करून दहीहंडी फोडली. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्ण- राधाची वेशभूषा करून गोविंदा आला रे... आला... असा जयघोष केला.ग्लोबल इंग्लिश स्कूल, पारडगावपारडगाव : येथील ग्लोबल पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी राधा- कृष्णांची वेशभूषा करून पालकांची मने जिंकली. या प्रसंगी वैशाली सुरशे, संगीता वाघमारे, भाग्यश्री बागुल आदींसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.राजमाता जिजाई इंग्लिश स्कूलजाफराबाद : येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मनोरा तयार करून दहीहंडी फोडली. या प्रसंगी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.बालाजी विद्यालय, वालसावंगीवालसावंगी : येथील बालाजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोथलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार लाठे, सचिव संजय कोथलकर होते. दरम्यान मान्यवरांच्याहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यश लोखंडे, कुणाल कोथलकर हे कृष्णाच्या वेशभूषेत होते. तर वैष्णवी कोथलकर, मानसी यांनी राधेची वेशभूषा साकारली होती. यश लोखंडे याने दहीहंडी फोडली. या प्रसंगी मुख्याध्यापक कैलास फुसे, योगेश घुले, विशाल गुजर, भारत घुनावत, अनंत बारोटे, गजानन लोखंडे, धनंजय साबळे, गजानन हिवाळे आदींची उपस्थिती होती.युनिक पब्लिक स्कूल, नेरनेर : येथील युनीक पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. दरम्यान असंख्य विद्यार्थ्यांनी राधा- कृष्णाची वेशभूषा केली होती. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती.जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णीटेंभुर्णी : येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल व जिजाऊ हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी राधा- कृष्णाची आकर्षक वेशभूषा करून दहीहंडी फोडली. कार्यक्रमाला प्राचार्य संजय फलटणकर, जनार्दन पैठणे, त्र्यंबक सातपुते, संगीता रिंडे, रत्नमाला चव्हाण, सविता भोपळे, वर्षा अग्रवाल, दिव्या जाधव, शिवकन्या देठे, वैशाली बोराडे, नंदा सवडे, पार्वती सवडे, मंदाकिनी सवडे, रिजवान पठाण, संगीता सवडे आदिंची उपस्थिती होती.सरस्वती भुवन हायस्कूलजालना : शहरातील श्री. सरस्वती भुवन व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. क्रीडा शिक्षक शेख यांनी गोविंदा पथक तयार केले होते. कार्यक्रमाला विनयकुमार देशपांडे, विलास नाईक, आर. पाटील, कुलकर्णी, आंधळे आदींची उपस्थिती होती. व्ही. जी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.परतुरात बाळ- गोपाळांचा उत्साह शिगेलापरतूर : शहरातील दहीहंडीची उंची वाढल्याने अनेकदा प्रयत्न करूनही सहभागी संघांना फोडता आली नाही. यानंतर सर्व संघांनी एकत्र येत संगीत रजनीच्या गीतावर ठेका धरत ही दहीहंडी फोडली. शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले.
‘गोविंदा’च्या जयघोषात दहीहंडी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:32 AM