लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील मोंढा परिसरात असलेल्या अलंकार ज्वेलर्सवर बंदूकधारी पाच दरोडेखोरांनी गुरूवारी दुपारी दरोडा टाकला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांनी आरडाओरड केल्याने, २० हजारांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले.परतूर शहरात गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास एका चार चाकी गाडीत पाच दरोडेखोर ग्राहकाच्या बहाण्याने माजी नगराध्यक्ष प्रदीप कुमार यांच्या अलंकार ज्वेलर्स या सोन्या- चांदीच्या दुकानावर आले. दुकानाताच शिरताच चाकू व बंदुकीच्या धाक दाखवत दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन स्ट्राँग रूमपर्यंत दरोडेखोर पोहचले. व सोन्या चांदीचा ऐवज बॅगेत भरत असताना दुकानातील एका ग्राहकाने बाहेर येऊन आराडाओरड के ली. याचवेळी दुकानातील कर्मचा-याने झटापट केल्याने हे दरोडेखोर सोन्या- चांदीचा ऐवज टाकून पळाले. मात्र, जाताना २० हजारांची रोकड लंपास केली. या घाईत ज्वेलर्सच्या स्ट्राँग रूममध्ये त्यांची एक बंदुक विसरली आहे. ही घटना मोंढा भागात भर वस्तीत व भर दुपारी झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी ‘एलसीबी’चे राजेंद्रसिंग गौर, स.पो.नि. पवार यांनी भेट दिली. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.घटनेचा तात्काळ तपास लावा- पालकमंत्री लोणीकरया घटनेसंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवरून पोलीस अधीक्षक चैतन्य यांच्याशी संपर्क साधून ही घटना गांभिर्याने घेऊन तात्काळ दरोडेखोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.घटना सीसीटीव्हीत कै ददरोड्याची ही घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. मात्र, या दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. दरम्यान या घटनेविषयी परतूर पोलिसांमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
परतूरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:16 AM