वडीगोद्री : महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्री क्षेत्र पांचाळेश्वर (ता. गेवराई) येथे श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
कोल्हापूरला सकाळची भिक्षा, मध्यान्ह भोजन श्री क्षेत्र पांचाळेश्वरला व निद्रा माहुरगडला असे दत्तात्रेय प्रभुंचे नित्य उपक्रम असून, पांचाळेश्वर हे अन्यसाधारण महत्त्व असलेले स्थान आहे.
पांचाळेश्वर येथे चार ते पाच अभिषेक (स्नान) पाच ते सहा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर सात ते नऊ दत्तात्रेय बाळक्रीडा ग्रंथाचे व दत्तात्रेय स्तोत्र पठण पारायण होऊन सकाळी ११ ते ११.३० आत्मतीर्थ स्नान करून दुपारी १२ ते १२.३० महाआरती करून रात्री प्रभूची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्री दत्तात्रेय जन्मोत्सव निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी श्री दत्तात्रेय प्रभू आत्मतीर्थ प्रतिष्ठानतर्फे लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आमदार बदाम पंडित, उद्योगपती नितीनचंद्र कोटेजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, पंचायत समिती सदस्य मोनिका खरात आदींची उपस्थिती होती.