बाजारपेठेत गर्दी
परतूर : शहरांतर्गत मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बाजारपेठेत येणारे नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. शिवाय मास्कचाही वापर केला जात नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
भोकरदन : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वाहतूक सुरू आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. होणारी वृक्षतोड पर्यावरणास घातक असून, ही वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रंथालयाची पाहणी
जालना : शहरातील श्रीराम वाचनालयाला कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे सहायक क्षेत्रीय अधिकारी राजीव रंजन कुमार यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाम शेलगावकर व इतरांची उपस्थिती होती.
चालकांची कसरत
बदनापूर : तालुक्यातील रोषणगावसह इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला असून, रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.