शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी दिला राख यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:56 AM

डॉ. आंबेडकर सभागृहात स्व. शंकरराव राख यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी मंत्री शंकरराव राख यांच्या निधनाने जालना जिल्ह्याने एका महान नेत्याला गमावले आहे. त्यांनी जिल्ह्याच्या विकासात तसेच वैद्यकीय क्षेत्रात जे योगदान दिले आहे. ते न विसरता येणार असल्याचे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी मंगळवारी केले. येथील डॉ. बासाहेब आंबेडकर सभागृहात स्व. शंकरराव राख यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमास माजी आ. शिवाजी चोथे, शकुंतला शर्मा, शंकर नागरे, डॉ. संजय राख, राजेंद्र राख, डॉ. अनुराधा राख, सगीर अहेमद, शाह आलम खान, तुळशीराम रणमारे, मुख्य संयोजक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शेख महेमूद, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुधाकर निकाळजे, किरण गरड, संजीवनी तडेगावकर, अब्दुल हाफीज, साईनाथ चिन्नादोरे, लक्ष्मण वडले. विनित साहनी, बदर चाऊस, अ‍ॅड. वाल्मिक घुगे, अ‍ॅड.मधुकर सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादंरगे, अकबर इनामदार, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. संजय अंबेकर, शैलजा काळे, सुभाष कोळकर, शरद देशमुख, अ‍ॅड. सुनील किनगावकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजय लकडे यांनी केले.माजी मंत्री शंकरराव राख एक चतुस्त्र व्यक्तिमत्त्व होते. शेवटच्या श्वासपर्यंत त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. तसेच स्पष्ट वक्त होते. वैद्यकीय व्यवसाय करताना एखाद्याकडे पैसे नसतील तर ते खिशातून काढून देत असत. शंकरराव राख यांनी राजकारण, समाजकारण करताना कधी भेद केला नाही. त्यांना जे वास्तव वाटत असे, ते निर्भीडपणे मांडत. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देताना त्यांनी समाजाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांच्या पत्नी स्व. कृष्णा राख यांनीही त्यांना जी साथ दिली होती. ती निश्चित समाजासाठी प्रेरणादायी होती. त्यांचे सर्व चांगले गुण त्यांचे पुत्र आणि डॉ. संजय राख व त्यांच्या परिवारात उतरले असून, ते देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्रीकुठल्याही सामाजिक अथवा वैचारिक कार्यक्रमांना माजी मंत्री शंकरराव राख हे आवर्जून हजेरी लावत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमांतून समाजाला एक दिशा देण्याचे काम केले आहे. ते नेहमीच चांगुलपणा जपण्याला मोठे महत्त्व देत असत. त्यांनी जे जे काम केले त्यात त्यांनी सर्वस्व झोकून देऊन ते चांगले कसे होईल, यावर ते भर देत असत. जेइएस महाविद्यालयातील महात्मा गांधी विचार मंचाशी देखील त्यांचा जवळचा संबंध होता. गांधीजींचे विचार हे नेहमीच प्रेरणादायी असतात. त्यांच्या विचारांचा प्रसार होणे गजरेचे असल्याचे ते आवर्जून सांगत. - प्रा. बी.वाय. कुलकर्णीमाजी मंत्री शंकरराव हे आधी डॉक्टर होते. त्यामुळे त्यांनी अनेकांना वैद्यकीय सेवा देताना ती मोफत दिली. त्यावेळी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. त्यावेळी ते एखाद्या खेड्यातून बोलावणे आल्यास ते तातडीने मिळेल त्या वाहनाने तेथे पोहोचून रूग्णांना मदत करत. त्यासाठी ते पैसेही घेत नसल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. एक कर्तव्यदक्ष डॉक्टर कसा असावा याचे त्यांनी उदाहरण घालून दिले आहे.- डॉ. निसार देशमुखमाजी मंत्री शंकरराव राख आणि माझ्या वडिलांची पक्की मैत्री होती. अनेक अडचणींच्या काळात राख कुटुंबाने आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या निधनाने आपण एका द्रष्ट्या नेत्याला मुकलो असून, त्यांच्या परिवारातील सदस्य डॉ. संजय राख, राजेंद्र राख हे तेवढेच प्रेमाचे संबंध कायम ठेवून असल्याचे समाधान आपल्याला आहे. - अ‍ॅड. विलास खरातराख परिवार आणि गोरंट्याल परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ज्यावेळी आमच्या संकटात त्यांनी अनेकवेळा मोलाची मदत केली आहे. आजही त्यांच्या परिवाराचे आणि आमचे तेवढेच प्रेमाचे संबंध कायम आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मी तुझे नाव सुचविल्याचे त्यांनी मला फोन करून सांगितले होते. त्यावेळी मी आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या निधनाने आपण एका थोर व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षाराख यांनी मला मुलीप्रमाणेच प्रेम दिले. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमांना ते हजर राहत असत, तसेच त्यांच्या समोर आम्ही सर्वजण लहान होतो. परंतु त्यांनी वयाचे बंधन न ठेवता. ते आमच्यात मिसळून जात. अनेक कार्यक्रमांना जाण्यासाठी आता सारख्या गाड्यांचा ताफा नसे, त्यावेळी राख काका आम्हाला आवर्जून येण्या-जाण्याची व्यवस्था विचारून तजवीज करायचे. अनेकवेळा त्यांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला नेल्याचे आजही आठवते. त्यांच्या निधनाने आम्ही परिवारातील सदस्यालाच मुकलो आहोत. - विमल आगलावे, जिल्हाध्यक्षा, महिला काँग्रेस

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिकPoliticsराजकारण