एक ते पंधरा मे दरम्यानच्या शासकीय अहवालांचा विचार केल्यास कोरोनाचे रुग्ण हे साडेनऊ हजारपेक्षा अधिक वर पोहचले असून, मृत्यांची संख्या ही जवळपास १७९ एवढी आहे. ही मृत्यूची संख्या नागरिकांना धडकी भरविणारी आहे. परंतु केवळ आकडे पाहून आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा घरबंद राहणेच योग्य ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या नावाखाली चांगभलं
जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी सकाळी ११ वाजेनंतर सर्वव्यवहार आणि रस्त्यावर फिरणे बंद करण्यात आले आहे. परंतु शेतीविषयक कामे तसेच बँक, वित्तीय संस्था हे सुरू आहे. अनेकजण बँकेत जाण्याचे कारण सांगतात, तर काही जणांनी चक्क आपल्या खिशात सातबाराचा उतारा ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अडविल्यावर मी शेतकरी असल्याचे सांगून, खते, बियाणे तसेच अन्य काही कारणे सांगून कारवाई टाळत असल्याचे दिसून आले.