लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : येथील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. शाम दशरथ काळे (३६, रा. चंदनझिरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.काळे सकाळी काही मित्रांसोबत पोहण्यासाठी नगरपालिकेच्या सावरकर जलतरण तलावावर गेले होते. बराच वेळ पोहल्यानंतर सर्वजण पाण्याबाहेर येवून थांबले. काही वेळाने शाम काळे पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, ते पाण्यात बुडाले. दहा ते पंधरा मिनिटांनंतर हा प्रकार लक्षात आला. सोबतच्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून जालना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहाय्यक उपनिरीक्षक घोडे तपास करत आहेत.सावरकर जलतरण तलावात जीवरक्षक नाही. तसेच पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कुठल्याही आवश्यक सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालिकेने जीवरक्षकाची नेमणूक केली असती तर काळे यांचा जीव वाचला असता.
पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:02 AM