दीपक बाबूराव घोडसे (२७) असे मृत युवकाचे नाव आहे. सिनगाव जहागीर येथील दीपक घोडसे हा सोमवारी रात्री गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला नवीन बसस्टँडजवळ झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या बाजूला विषारी द्रवाचा डबा सापडला. त्यामुळे गावातील युवक, नातेवाइकांनी तत्काळ त्याला खासगी वाहनाने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तब्येत अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत समाधान बाबूराव घोडसे यांनी दिलेल्या माहितीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देऊळगाव राजा रेफर रुग्णालय
देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सर्पदंश, विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी सामग्री उपलब्ध आहे. असे असतानाही कोणताही रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर एक चार ओळीची चिट्ठी रुग्णांच्या नातेवाइकाकडे देऊन रेफर टू जालना केले जाते. वेळेत उपचार मिळत नसल्याने यात अनेक रुग्णांचा जीव जात आहे. ही बाब पाहता प्रकृती अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर रुग्णालयातच चांगले उपचार करावेत, याकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.