जालना : येथील एमआयडीसीत असलेल्या ओम साईराम (उमा स्टील)ने अद्ययावत ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. या प्लांटचे मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यातील ६० टक्के ऑक्सिजनचे सिलिंडर हे मोफत रुग्णांना देण्यात येणार आहे. ५०० सिलिंडर निर्मितीचा हा प्लांट असून, हवेतून यंत्राच्या साहाय्याने ऑक्सिजन घेऊन तो सिलिंडरमध्ये भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमास उद्योजक घनशाम गोयल, सुरेंद्र पित्ती, कंपनीचे संचालक राजेंद्र भारुका, दिनेश भारुका, नीलेश भारुका, लोकेश भारुका, रवींद्र पित्ती, अंकुश अग्रवाल, राम अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे यांनी ऑक्सिजन प्लांटसह स्टील कंपनीची पाहणी केली.
याची सविस्तर माहिती दीपक त्रिवेदी, विजय नागोरी, योगेश म्हस्के, दिनेश थाडा, लक्ष्मीकांत तिवारी यांनी दिली.