लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला. ज्यावेळी हे दोघे धावपटू जालन्यात पोहचले त्यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गरजरात स्वागत करण्यात आले. दररोज ८० ते किलोमीटर धावत हे अंतर पार केल्या नंतरही त्या दोघांच्या चेहऱ्यावर कुठलीच ठकावट दिसून आली नाही.येथील कालिका स्टीलच्या वतीने मुंबई ते जालना हे अंतर दिपक गिंद्रा आणि अमर भट यांना पार करण्यासाठी स्वतंत्र १० दहा जणांचे पथक त्यांच्या सोतबत दिले होते. त्यावेळी त्या पथकातील सदस्यांनी देखील जी मदत केली, ती आम्ही विसरू शकत नसल्याचे गिंद्रा आणि भट यांनी सत्काकराच्यावेळी सांगितले. प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उद्योजक किशोर अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावपटूंचा गौरव करण्यात आला. गोरंट्याल यांनी सांगिले की, मुंबई ते जालना हे अंतर या दोघांनी कापून एक मोठा इतिहास रचला आहे. यावेळी खोतकर यांनी सांगितले की, धावणे हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. त्यामुळे फनरनर्स ग्रुप आणि कालिका स्टीलने जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे नमूद केले.ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्यासाठी यावेळी फिजीओथेरपी तज्ज्ञ डॉ. भाविक गाडीया यांची मोलाची साथ मिळाल्याचे आवर्जुन सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू रूप बेताला यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे धावपटूंनी सांगितले. कालिका स्टीचे संचालक अनिल गोयल, अरूण अग्रवाल, सुनील गोयल, जयभगवान जिंदल, अनुप अग्रवाल यांची उपस्थिती होती. कालिका स्टीलच्या ज्या पथकाने मुंबई ते जालना या दरम्यान दोन धावपटूंना मदत केली, त्यांचाही यावेळी स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मधुमेहावर केली मातपूर्वी धावण्याचा आपला काही संबंध नव्हता. परंतु रायझर ग्रुपच्या संपर्कात आल्यावर धावण्याची आवड निर्माण झाली. मधुमेह असताना आपण धावू शकू असा विचारही मनात नव्हता. मात्र नंतर हिंमत करून सर्वांच्या प्रोत्साहानामुळे आपण थेट मुंबई ते जालना हे अंतर कापल्याचे आता सांगूनही खरे वाटत नसल्याची प्रतिक्रिया अमर भट यांनी व्यक्त केली.दीड तास झोप घेत होतोमुंबई ते जालना हे अंतर कापतांना मनात विश्वास होता. परंतु सर्वांचे प्रोत्साहन आणि कालिका स्टीलच्या सोबत असलेल्या दहा जणांच्या टीममधून जी मदत झाली त्यामुळेही शक्य झाले. दररोज साधारपणे ८० किलोमीटर धावल्यानंतर केवळ दीड तासाची झोप घेत असल्याची प्रतिक्रिया दिपक गिंद्रा यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
दीपक गिंद्रा, अमर भट..दौडनाही जीवन का नाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:46 AM