गोंदेगाव येथे ६५० जणांचे लसीकरण
जालना : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव अंतर्गत गोंदेगाव येथे कोविड लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला. या वेळी ६५० जणांचे लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच साहेबराव वाघ, ग्रामसेवक नारायण शेळके, शेख फकीर, डाॅ. हरकळ, बदर पाटील, पैठणे, भालतीडक, शिनगारे, कोल्हे, मच्छिंद्र वाघ, सुरेश तिडके, शाहाजी घोडके, तुळशीराम वाघ आदी हजर होते.
मेघराज शिंदे सायंटिस्ट परीक्षेत राज्यात दुसरा
परतूर : येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मेघराज शिंदे हा होमीभाभा ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेत राज्यात दुसरा आला असून, सिल्व्हर मेडल पटकावले आहे. याबद्दल त्याचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थाचालक संदीप बाहेकर, प्रिन्सिपल महाजन, मगर, तिवारी, पांडे, आकात, भानुदास टकले, संपत टकले आदींची उपस्थिती होती.
मेस्ट संघटनेच्या उपाध्यक्षपदी संजय चव्हाण
मंठा : मेस्टा संघटनेची नुकतीच जालना येथे बैठक झाली. या बैठकीत संजय चव्हाण यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष पी. एन. यादव, राज्य सचिव सतीश मोरे, प्राध्यापक डॉ. नामदेव दळवी, ज्ञानेश्वर पुंगळे, राजू तारे, बळीराम जाधव, सोपान सपकाळ, महेंद्रसिंग मोताफळे, सुभाष निर्वळ, बी. एम. गोरे आदींची उपस्थिती होती.
परतूर येथे वृक्षारोपण
परतूर : शहरातील विठ्ठलनगर येथे विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. आदर्श शिक्षक दिलीप मगर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक विष्णुपंत तोटे, विलास चव्हाण, कैलास कवले, बालाजी सांगुळे, कार्तिक कवले, धीरज गाडेकर आदींची उपस्थिती होती. आदर्श शिक्षक दिलीप मगर म्हणाले, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व कळले आहे; त्यामुळे प्रत्येकाने एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे.
वीजपुरवठा खंडित, ग्राहकांची गैरसोय
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात सतत तांत्रिक बिघाड होत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. अचानक वीज गुल होत असल्याने वीज ग्राहकांसह शेतकऱ्यांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.