अंकुशनगर - अंबड तालुक्यातील महाकाळा येथे राष्ट्रीय महामार्गावरच देशी दारूचे दुकान आहे. दारूड्यांमुळे महिला व ग्रामस्थ हैराण झाले आहे. हे दुकान तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाकाळा हे गाव औरंगाबाद- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरच वसलेेले आहे. गावाच्या जवळच राष्ट्रीय मार्गावर देशी दारूचे दुकान आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री केली जाते. अंकुशनगर येथे शिक्षणासाठी मुली येतात. तसेच येथून ये-जा करणार्या महिलांची संख्याही मोठी आहे. त्यातच दारूडे शिवागीळ करतात. त्याचा त्रास महिला व मुलींना होतो. रात्रीच्या वेळी येथे दररोज वाद होता. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने दारूचे दुकान बंद करावी, नसता तीव्र कुटुंबासह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर राजेंद्र लाड, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत ढोकळे, ज्ञानेश्वर कव्हळे, राधा मुळे, कुसुम कांबळे, रत्नमाला नरवडे, अमोल सराटे, नितीन सराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
080321\08jan_25_08032021_15.jpg
===Caption===
विविध मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक सुरेश धोत्रे यांना निवेदन देताना राजेंद्र लाड, ज्ञानेश्वर मुळे आदी.