घनसावंगी : तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ८२ हजार हेक्टरवरील पिके हातची गेली आहेत तर ऊस, मका ही पिके भुईसपाट झाली आहेत. गोदावरी व दुधना काठच्या नागरिकांचे शेती उपयोगी साहित्य व जनावरांचा चारा वाहून गेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, प्रशासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता सरसकट ५० हजार रुपये शासनाने द्यावे, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन घनसावंगी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना देण्यात आले आहे. तसेच कृषी अधिकारी कार्यालयातही अधिकारी उपस्थित नसल्याने खुर्चीला निवेदन देण्यात आले. यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अशोक हेमके, जिल्हा प्रमुख सैयद मोईनोद्दीन, विश्वंभर भानुसे, तात्यासाहेब भानुसे, बाबूराव घुमरे, दीपक आनंदे, अरविंद घोगरे, राजेंद्र अटकळ, बाळासाहेब ढेरे, सुनील काळे, दत्ता उगले, शुभम कोरडे, कृष्णा यादव, दत्ता वाघमारे, कृष्णा उढाण, शरद ढेरे, ज्ञानेश्वर ढेरे, वैभव मस्के, विलास कोकरे, परमेश्वर पांढरे, माऊली सावंत, आनंद काळे, विकास काळे, मनोहर काळे, विलास वाघमारे आदींची उपस्थिती होते.