लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्यावतीने महिला शिक्षकांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या संगणकीय प्रकणालीद्वारे होत आहेत. उपरोल्लेखित शासन निर्णयातील तरतूरदीनुसार तालुका मुख्यालयापासून सुदूर असलेल्या गावातील शाळा अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने यापूर्वीच केली होती. त्यानुसार २०१७ साली जालना जिल्हा परिषदेच्या वतीने ८५ गावांची यादी प्राथमिक स्वरुपात अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. परंतु, जिल्हा प्रशासनाने सर्वसाधारण क्षेत्र घोषित केले. शासनाने अवघड क्षेत्राची माहिती शिक्षण विभागाला मागविली आहे. यासाठी २० मेची डेडलाईन देण्यात आली होती. परंतु, अद्यापही जि.प.ने महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित केले नाही. त्यामुळे महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगेश जैवाळ, आदिनाथ सिरसाठ, अमोल कुलकर्णी, रमेश गायकवाड, लक्ष्मण शिरसाठ, जिजा वाघ, मोतीलाल रायसिंग, विकास पोथरे, विष्णू वाघमारे, भारत गडदे, नितीन आरसूळ, वैशाली कुलकर्णी, योगिता दैने, तानाजी राठोड, एकनाथ मुळे, नागरे, हजारे उपस्थित होते.
महिला शिक्षकांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:49 AM