बदनापूर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बदनापूर तालुक्यातील अकोला येथे केलेल्या खड्ड्यात पडल्याने मृत पावलेल्या पांडूरंग मुंढे यांचे प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांसह, आमदार नारायण कुचे विरोध करत आहेत.
अकोला येथील ४० वर्षीय पांडूरंग किसन मुंढे यांचे प्रेत दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गासाठी दुधना नदीच्या पात्रात केलेल्या ६० ते ७० फुट खड्ड्यातील पाण्यात तरंगताना गावकऱ्यांनी पाहिले. बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यास गावकरी आणि आमदार कुचे विरोध करत आहेत.
जोपर्यंत मृत व्यक्तीला मदत मिळत नाही आणि समृद्धी महामार्ग ठेकेदार आणि आधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आतापर्यंत या खड्ड्यात पडून २ व्यक्ती मृत तर एक जण जखमी झाले आहेत.