शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 1:15 PM

काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो.

- पवन पवारवडीगोद्री (जि.जालना) :मराठा आरक्षणासाठी मागील नऊ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मराठा समाज महाराष्ट्रच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या नऊ दिवसांपासून राज्यातील सर्व नेते मंडळी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेले. लाठी हल्ल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून, संपूर्ण राज्यातील मराठा समाज पेटून उठला आहे. या परिस्थितीमुळे समाजातील काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. काही अनुचित प्रकार घडला तर महाराष्ट्रातील मराठा समाज चवताळून उठेल व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या घटनेमुळे महाराष्ट्रात विपरीत परिणाम सर्व समाज बांधवांना सोसावा लागू शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तात्काळ झेड सुरक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आप्पासाहेव कुढेकर, किरण तारख, पांडुरंग तारख, शैलेश पवार, संजय कटार, ॲड.अमोल लहाने, सुदाम मुकणे, बाळासाहेब जाधव, किशोर मरकड, अशोक तारख यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाPoliceपोलिस