भोकरदन : शहरातील सिल्लोड-भोकरदन महामार्गावरील महात्मा फुले चौकातील अतिक्रमण हटवण्याची मागणी मंगळवारी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला केली आहे.
शहरातील महात्मा फुले चौक हा मुख्य मार्गावरील चौक असून, येथे बहुतांश ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शहरात रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरात अपघाताचे प्रमाणही वाढत असल्यामुळे तात्काळ अतिक्रमण हटवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. ३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत असून, त्याअगोदर अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या निवेदनावर माजी राजेंद्र दारुंटे, नगरसेवक रमेश जाधव, अ.भा.स.परिषद ता. अध्यक्ष विलास शिंदे, समीर देशमुख, गंगाधर ढोके, भूषण जाधव, ईश्वर इंगळे, राजू गोरे, विष्णू कोलते, डॉ. नईम, राजू चोपडे, विष्णू घोडके, संजय जाधव, सागर जाधव, सुरेश गिराम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.