आष्टी : गावपातळीवरून पीक पेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, यासाठी शासनाने ई- पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यात नोंदविण्याची सुविधा महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मोबाईल ॲपमध्ये कशा प्रकारे पीक पेरा नोंद करावी यासाठी लिखित पिंपरी, ब्राम्हणवाडी येथे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तलाठी एन.पी. बाळापुरे यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करण्याचे आवाहन केले. यावेळी लिखित पिंपरी येथे भास्कर सोळंके, पांडुरंग मालघन, शरद देशमुख, विजय सोळंके, बाळासाहेब चौधरी, योगेश सोळंके, परमेश्वर सोळंके, राजेश चौधरी, रवी सोळंके, योगेश गायके, विलास सोळंके, गोपाळ सोळंके यांची उपस्थिती होती.
फोटो
परतुर तालुक्यातील लिखित पिंपरी येथे ई- पीक पहाणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलाठी एन.पी. बाळापुरे, भास्कर सोळंके, पांडुरंग मालघन यांची उपस्थिती होती.