परतूर : अंधश्रघ्दा समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर व तत्सम विचारांच्या व्यक्तीच्या हत्येतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोवींद पानसरे, पत्रकार गौरी लंके श, प्रा. डॉ. एम. कलबुर्गी या विचारवंताच्या खुनामागे मोठे षडयंत्र आहे. नियोजन बध्द पध्दतीने हे खून करण्यात आले आहेत. या मध्ये सनातन संस्था व हिंदू जण जागरण या समितीच्या साधकांचा सहभाग आहे. अशा अक्षम्य तपासाच्या दिरंगाई मध्ये राजकीय ईच्छा शक्तीचा अभाव जाणवत आहे. आजही या संघटना कडून पत्रकार, संपादक राजकीय व्यक्ती, विचारवंत यांच्या जिविताला धोका आहे.तरी या खूनामागील सुत्रधारांचा तात्काळ शोध घेवून कारवाई करण्यात यावी, असे उप विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान जिल्हा सचित रमाकांत बरीदे, कल्याण बागल, लक्ष्मीकंत माने, देविदास आठवे, सोपान राकूसले, सागर रनबावळे आदींची उपस्थिती होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:14 AM