लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहर व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. यात साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. यामुळे खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापामुळे दोन महिन्यात पाच ते सहा जणांचे प्राण गेले आहे. यामध्ये गुलाब जाधव (३२), चंद्रभागाबाई जाधव (रा. भिवपूर), तर भायडी येथील हरणाबाई दळवी, कमलबाई जंजाळ यांचा सुद्धा डेंग्यू सदृश्य तापामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सोयगाव देवी येथील राजू राऊत यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. शिवाय शहरातील काझी वेस, प्रसाद गल्ली परिसरात सुध्दा अनेक रूग्ण तापामुळे फणफणले आहेत. हे रूग्ण भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात जाऊन आले आहेत. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या कारभार हा परिचारिकेच्या विश्वासावर सुरू आहे. शिवाय वैद्यकीय अधीक्षकच या रूग्णालयात आठ ते पंधरा दिवसाला येतात. येथे येणाऱ्या रूग्णाला औरंगाबाद किंवा जालना येथे रेफर करण्याचे प्रकार या ग्रामीण रूग्णालयात सर्रास सुरू आहेत. यामुळे रूग्णांचा या ग्रामीण रूग्णालयावर विश्वास राहिला नाही. यामुळे खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्ण जात आहेत.४भोकरदन ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे आहेत. ही पदे भरलेली आहेत. परंतु, येथील दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या विश्वासावर या रूग्णालयाचा कारभार चालत आहे.४या सर्व वैद्यकीय अधिकाºयांपैकी केवळ अमोल मुळे हेच एकमेव वैद्यकीय अधिकारी भोकरदन शहरात मुक्कामी राहतात. उर्वरित सर्वच जण जालना, औरंगाबाद, सिल्लोड येथून अपडाऊन करतात.
डेंग्यूची साथ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:34 AM