प्रारंभी भास्कर अंबेकर यांनी किशोर अग्रवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते सर्वांच्या मदतीला कसे तत्पर असते ते त्यांनी सांगितले. यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांनीदेखील किशोर अग्रवाल हे भाजपचे काम करत असले तरी त्यांचे आणि आमचे पारिवारिक संबंध होते. ते कुठल्या मदतीसाठी धावून येत असल्याच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. आ. नारायण कुचेही यांनी आठवणंना उजाळा दिला. आ. संतोष दानवे यांनी किशोर अग्रवाल आणि माझे वडील रावसाहेब दानवे यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे आपण त्यांना लहानपणापासून ओळखत होतो. त्याांच्या जाण्याने परिवारातील सदस्य गमावल्याचे दु:ख कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अर्जुन खोतकर यांनीदेखील अग्रवाल यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुंबईला नेऊनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नसल्याचे शल्य हे कायम सलत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जालन्याच्या सामाजिक आणि उद्योगक्षेत्राचे नुकसान झाल्याची भावना खोतकरांनी व्यक्त केली. यावेळी आपणच नाही तर, जालन्यातील सर्वजण हे अग्रवाल यांच्या पुढील पिढीच्या कायम संपर्कात असून, त्यांना कधीही वाट्टेल ती मदत करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे खोतकर म्हणाले. आगामी काळात अग्रवाल परिवाराकडून मुलांसाठी अद्यावत वाचनालय आणि जालना शहरात ५० हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमास राजेंद्र जेथलिया, रितेष मिश्रा, महेश सारस्वत, वीनित साहनी, सतीश पंच, भरत जैन, दिलीप शाह, डॉ. सुभाष अजमेरा, ॲड. किशोर राऊत, सतीश सोडाणी, अशोक शर्मा, किरण गरड यांच्यासह अग्रवाल परिवारातील गोवर्धन अग्रवाल, सुनील अग्रवाल आणि राहुल अग्रवाल यांच्यास परिवारातील सदस्य हजर होते.
४५ वर्षांचा सहवास हरवला
किशोर अग्रवाल हे कधीच मी हे केले मी ते केले असे म्हणणारे नव्हते. ते कधीही कार्यकर्ते म्हणूनच राहिले. त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्याची इच्छा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नसल्याची आपल्याला खंत आहे. त्यांचे चुलते आणि किशोर अग्रवाल यांचे संबंध हे १९७५ पासूनचे होते. असे सांगून किशोर अग्रवाल यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असून, ती कधीही भरून न निघणारी आहे.
हरिभाऊ बागडे, माजी विधानसभा अध्यक्ष