लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या चोरी, दरोड्यांमध्ये सक्रिय राहून गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या सात सराईत गुन्हेगारांवर जालना जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रारंभी पोलिसांकडून महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांडे हद्दपारीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी प्रकरणे पाठविली होती. यात जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी यावर निर्णय देत सात जणांवर जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या प्रस्ताव मंजूर केले आहेत.यातील एका गुन्हे गारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून त्याला नाशिक येथील कारागृहात रवाना करण्यात आले. उर्वरित सहा जणांचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलसांनी सांगितले.या पोलीस आणि महसूलच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हद्दपारीची कारवाई होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सात गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:43 AM