शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:55 PM

२९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली; निवडणूक लांबल्याने आता मतदारनिहाय घोंगडी बैठका घेणार

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : सरकारने दोन दिवसात नवीन डाव टाकला असून निवडणुकाच डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला २९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल, अशी माहिती मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. निवडणुक पुढे ढकलन्याचे काही कारण नाही, मराठ्यांच्या पुढे सरकार हतबल झाले आहे आता मतदारसंघनिहाय आपण काम करू. सर्व इच्छुक उमेदवारांनी २४ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

जरांगे पुढे म्हणाले, सरकार आपल्या भूमिकेची  वाट पाहत आहे. आपली रणनीती सुरू असून यावेळेस जे होईल ते होईल. निवडणुकीची घोषणा होण्या अगोदर आपण बैठक ठरवू. आपले डाव सरकारला का कळू द्यायचे? सर्व मराठा समाजाला सांगायचे, त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ. आता २९ ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही, असेही जरांगे यांनी जाहीर केले. 

आता मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठकाप्रत्येक गावाने ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना नोंदी मिळाल्या नसल्याने तहसीलदारकडे जाऊन जाब विचारा. सरकारवर बेकार वेळ, ते आपल्या भूमिकेवर ते ठरवणार होते.आता आपण मतदारसंघ निहाय घोंगड्या बैठका घेऊ, बैठकीला मी येतो. दीड दोन महिन्यानंतर ठरवू, लढायच की कसे सर्वात मोठा रोष शेतकऱ्याचा आहे. राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.

सरकारने डाव टाकलायांना बहुतेक आंदोलन रणनिती उघडी करायची होती, म्हणून त्यांनी हा डाव टाकला. आताच आपण आपली रणनिती उघडली करायची नको. निवडणुकी पुढे ढकलन्याचे काही कारण नाही, मराठ्यांच्या पुढे सरकार हतबल झाले आहे. आता मतदारसंघ निहाय आपण काम करू. सर्व इच्छुक उमेदवारांनी २४ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज घेऊन यावे. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकत कोणाची नाही. मी संयमी आहे मराठे जर भूमिकेवर उतरले तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस