लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोपवाटिकेला देण्यासाठी भरपूर पाणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने वन प्रशिक्षण संस्थेतील सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका पाण्याअभावी करपून चालली आहे.येथील वन प्रशिक्षण संस्थेत सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सागवान, महू, चिंच, जांभूळ, लिंब यांसह विविध ४७ प्रकारची हजारो रोपटे आहेत. या रोपट्यांना पाणी देण्यासाठी येथे शेततळे, बोर, विहिरी आहेत. यांना सध्याही भरपूर पाणी असल्याचे येथील मजूर कामगारांनी सांगितले. रोपवाटिकेला पाणी देण्याचे योग्य नियोजन सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांनी केलेले नाही. यामुळे रोपवाटिकेतील रोपट्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यातील काही रोपे करपली आहेत.या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी विशेष म्हणजे सध्या येथे २० महिला-पुरूष मजूर कार्यरत आहे. यातील प्रत्येकाला दिवसाकाठी २५० रूपये रोजंदारी शासनाकडून दिली जाते. या रोपवाटिकेला पाणी देण्यासाठी ठिबक व स्प्रिंगलर यांचा उपयोग केला जात आहे. पण, अधिकाºयांनी सर्व काही रोपवाटिकेचे काम मजुरांवर सोपविल्याचे दिसत आहे. एकूणच रोपवाटिकेला प्रत्यक्ष भेट दिल्यावर अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. सर्व कामे ही मजुरांवरच सोपविल्याचे दिसून आले.दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे दुष्काळासह विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने दरवर्षी पावसाळ््यामध्ये शासनातर्फे महावृक्ष मोहिमेअंतर्गत हजारो रोपे लावली जातात. येणाºया पावसाळ््यातही मोठ्या प्रमणात वृक्ष लागवड करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे येथील रोपट्यांची सध्या प्रशासनाकडून देखभाल केली जात असून नव्याने काही रोपटी लावली जात आहेत. पण, जुन्या रोपट्यांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एकूणच वृक्ष लागवडीला प्राधान्य देत असतानाच हे सर्व गंभीर सुरू आहे.स्थलांतरित कार्यालय सापडेनासामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय काही दिवसांपूर्वी पांगारकरनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु, याची सर्वसामान्यांना कसलीही माहिती नाही. यामुळे अनेकजण दिवसभर शहरातच कार्यालय पाहत फिरतात. पण, त्यांना कार्यालय सापडत नाही. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हरवले म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाचा पत्ता विचारण्यासाठी किंवा काही कामासाठी अधिकाºयांना संपर्क केल्यास त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्रा बाहेर असल्याचे दिसून येते.
पाणी भरपूर असूनही रोपवाटिका करपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:37 AM