लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : तळपत्या उन्हाची तमा न बाळगता अंगारकी चतुर्थीनिमित्त जिल्ह्याच्या चारही बाजूने हजारो भाविकांचे जथे सोमवारी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी येत असल्याचे दिसून आले.गणेश भक्त मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीला श्री दर्शन महत्वाचे मानतात. मंगळवारी वर्षातील पहिलीच अंगारिका चतुर्थी असून गुढीपाडव्या शुभमुहूर्तावर गणराय सुवर्ण जडित चांदीच्या सिंंहासनावर विराजमान झालेले आहेत. त्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याचा अंदाज संस्थानच्या वतीने वर्तविण्यात आला.मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्याच्या कानाकोपºयातून अंगारकीला राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकाची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारीच सिल्लोड, अंबड, औरंगाबाद, देऊळगांवराजा, फुलंब्री आदी मार्गावरून महिला, पुरूष, चिमुकले राजूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसले. पायी येणा-या भाविकांसाठी सेवाभावी संस्था, संघटना व दानशूरांनी मोफत चहा, पाणी, फराळ, थंड व गरम पाण्याची जागोजागी केल्याचे पहावसाय मिळाले. वाढत्या उन्हामुळे सायंकाळनंतर रस्त्यांवरील भाविकांची गर्दी वाढली. रात्री नऊपर्यंत हजारो भाविक राजुरात दाखल झाले होते.संस्थानाच्यावतीने भाविकांना उन्हापासून बचावासाठी निवारा, वैद्यकीय उपचार, पिण्यासाठी पाणी, पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे, महिला व पुरूष भाविकासांठी स्वतंत्र दर्शन रांगा इ. तयारी करण्यात आली आहे. पायी येणारे भाविक, ग्रामीण भागातून येणाºया दिंड्या, पालखी, समूहाने येणा-या भाविकांना सामान्य दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी पासच्या रांगेतून दर्शनासाठी आग्रह धरू नये, असे आवाहन गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे यांनी केले आहे.
गणरायाच्या जयघोषात भाविकांचे जथे राजूरकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:11 AM